मोबाईलवरून आधार कार्डला मोबाईल नंबर कसा लिंक/अपडेट करायचा? (नवीन अ‍ॅप द्वारे संपूर्ण प्रक्रिया) 2026 

मोबाईलवरून आधार कार्डला मोबाईल नंबर कसा लिंक/अपडेट करायचा? (नवीन अ‍ॅप द्वारे संपूर्ण प्रक्रिया) 2026

आता घरबसल्या मोबाईलवरून आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक किंवा अपडेट करा! UIDAI च्या नवीन अ‍ॅपद्वारे मोबाईल नंबर कसा बदलायचा, याची संपूर्ण स्टेप-बाय-स्टेप माहिती.

 आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड हे आपल्या ओळखीचे सर्वात महत्त्वाचे पुरावे बनले आहे. शासकीय योजनांचा लाभ घेणे असो, बँक खाते उघडणे असो किंवा सिम कार्ड घेणे असो, सर्वच ठिकाणी आधार कार्ड आवश्यक असते. परंतु, जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल किंवा जुना नंबर बंद झाला असेल, तर अनेक कामे अडकून पडतात.
आता आधार धारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! UIDAI (Unique Identification Authority of India) ने एक नवीन मोबाईल अ‍ॅप लाँच केले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून आधार कार्डला मोबाईल नंबर अपडेट किंवा चेंज करू शकता.
या लेखात आपण या नवीन अ‍ॅपद्वारे मोबाईल नंबर अपडेट करण्याची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने (Step-by-Step) जाणून घेणार आहोत.
मुख्य वैशिष्ट्ये आणि शुल्क (Overview)
  • माध्यम: अधिकृत आधार मोबाईल अ‍ॅप (UIDAI Application)
  • वेळ: मोबाईल नंबर २४ ते ४८ तासांत अपडेट होतो (अधिकृत प्रोसेसिंग वेळ ३० दिवसांपर्यंत दाखवली जाते).
  • शासकीय शुल्क: ₹७५ (₹75 Processing Fee)
  • आवश्यकता: स्मार्टफोन, कॅमेरा (फेस ऑथेंटिकेशनसाठी) आणि इंटरनेट कनेक्शन.

 

मोबाईलवरून आधार नंबर अपडेट करण्याची स्टेप-बाय-स्टेप पद्धत आणि माहिती खालील प्रमाणे

जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमधील जुना मोबाईल नंबर बदलून नवीन नंबर लिंक करायचा असेल, तर खालील स्टेप्स फॉलो करा:

स्टेप १: अधिकृत अ‍ॅप इन्स्टॉल करा

  1. तुमच्या मोबाईलमधील Play Store ओपन करा.
  2. सर्च बारमध्ये Aadhaar असे टाईप करा.
  3. Unique Identification Authority of India (UIDAI) चे अधिकृत अ‍ॅप इन्स्टॉल (Install) करा.
  4. अ‍ॅप ओपन करून सर्व Permissions (Allow) द्या.

 

स्टेप २: नोंदणी आणि आधार क्रमांक प्रविष्ट करा

  1. Skip Introduction & Register या पर्यायावर क्लिक करा.
  2. I am ready with my Aadhaar वर क्लिक करा.
  3. तुमचा १२ अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि Continue वर क्लिक करा.
  4. अटी व शर्ती मान्य करून Proceed करा.
  5. त्यानंतर तुमच्या मोबाईलचे सिम कार्ड सिलेक्ट करून एसएमएस (SMS) व्हेरिफिकेशन पूर्ण करा.

स्टेप ३: फेस ऑथेंटिकेशन (Face Authentication)

  1. Continue to Face Authentication या पर्यायावर क्लिक करा.
  2. तुमचा चेहरा गोल फ्रेममध्ये ठेवा (चष्मा घातला असल्यास काढून ठेवा).
  3. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे डोळ्यांची उघडझाप (Eye Blink) करा.
  4. चेहरा स्कॅन झाल्यानंतर तुमचे Face Authentication यशस्वी होईल.
  5. त्यानंतर तुमचा ६ अंकी पिन (Security Pin) तयार करा.

स्टेप ४: माय आधार अपडेट (My Aadhaar Update) पर्याय निवडा

  1. अ‍ॅपच्या होम स्क्रीनवर Services सेक्शनमध्ये जा.
  2. तेथे My Aadhaar Update या पर्यायावर क्लिक करा. (टीप: जर हा पर्याय दिसत नसेल, तर अ‍ॅप अपडेट करा; काही दिवसांत हा पर्याय सर्वांसाठी उपलब्ध होईल).
  3. यामध्ये तुम्हाला Mobile Number Update हा पर्याय निवडायचा आहे.

 

स्टेप ५: नवीन मोबाईल नंबर टाका आणि ओटीपी व्हेरिफाय करा

  1. पहिल्या टप्प्यात तुमच्या जुन्या रजिस्टर नंबरवर आलेला OTP प्रविष्ट करा.
  2. यानंतर Enter New Mobile Number चा पर्याय दिसेल, तेथे तुम्हाला जो नवीन मोबाईल नंबर लिंक करायचा आहे तो प्रविष्ट करा.
  3. Send OTP वर क्लिक करा. नवीन नंबरवर आलेला ६ अंकी ओटीपी टाकून Submit करा.

स्टेप ६: पुन्हा फेस ऑथेंटिकेशन आणि ऑनलाईन पेमेंट

  1. नवीन नंबर व्हेरिफाय झाल्यानंतर पुन्हा एकदा Face Authentication पूर्ण करा.
  2. माहितीची पडताळणी करा आणि Confirm & Pay वर क्लिक करा.
  3. मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी ₹७५ शुल्क भरण्यासाठी PhonePe, Google Pay, Paytm किंवा UPI चा पर्याय निवडा.
  4. पेमेंट यशस्वी झाल्यानंतर स्क्रीनवर Payment Successful चा मेसेज येईल.

 

स्टेप ७: पावती (Acknowledgement Receipt) डाऊनलोड करा किव्हा प्रिंट काढून ठेऊ शकता

  1. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर Download Acknowledgement वर क्लिक करून पावती डाऊनलोड करा.
  2. या पावतीवर असलेला URN Number वापरून तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेटस चेक करू शकता.
  3. साधारणपणे २४ ते ४८ तासांत तुमचा नवीन मोबाईल नंबर अपडेट होतो.

📌 भविष्यात येणाऱ्या इतर सुविधा (Upcoming Services)

या नवीन अ‍ॅपमध्ये सध्या मोबाईल नंबर अपडेटची सुविधा सुरू झाली आहे. लवकरच या अ‍ॅपद्वारे खालील सेवादेखील उपलब्ध होणार आहेत:
  • Address Update (पत्ता दुरुस्ती)
  • Name Update (नाव दुरुस्ती)
  • Email ID Update (ईमेल आयडी अपडेट)

 

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

प्र. १: जर आधारला आधी कुठलाच मोबाईल नंबर लिंक नसेल तर काय करावे?
उत्तर: ज्यांचा आधी कोणताही नंबर लिंक नाही, त्यांच्यासाठी ही सुविधा लवकरच याच अ‍ॅपमध्ये उपलब्ध होईल. सध्यातरी ज्यांचा आधीचा नंबर उपलब्ध आहे, त्यांच्यासाठी अपडेट प्रक्रिया सुरू आहे.
प्र. २: मोबाईल नंबर अपडेट होण्यासाठी किती वेळ लागतो?
उत्तर: अ‍ॅपमध्ये ३० दिवसांचा कालावधी दाखवला जात असला, तरी साधारणपणे २४ ते ४८ तासांत (१ ते २ दिवसांत) नंबर अपडेट होतो.
प्र. ३: मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी किती फी लागते?
उत्तर: यासाठी शासनाचे अधिकृत ₹७५ प्रक्रिया शुल्क (Processing Fee) भरावे लागते.

डिजिटल मित्राचा सल्ला (digitalmitra24.com)

आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता आधार केंद्रावर रांगेत उभे न राहता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून ही प्रक्रिया करू शकता.
हा लेख तुमच्या सर्व मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून तेही त्यांच्या आधार कार्डचा मोबाईल नंबर अपडेट करू शकतील. सरकारी योजना आणि डिजिटल सेवांच्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी digitalmitra24.com ला नक्की भेट देत राहा!

Leave a Comment